loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंडगाव येथे बंद बंगला फोडून सुमारे सहा लाखाची चोरी, श्वान पथक, ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील अजय परशुराम पांचाळ(वय ४३) यांचा बंद बंगला फोडून रोख रक्कम व दागिने असे सहा लाख चौतीस हजार रुपयेची चोरी झाल्याची घटना आज उघडकीस आली. अजय परशुराम पांचाळ हे आज सकाळी मुबंईवरून गावी आले असता घरात प्रवेश केला असता घरातील सामान असताव्यस्त पडलेले व पाठीमागील दरवाजा उघडा दिसल्याने व आतील कपाट फोडलेले दिसल्याने घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले असता याबाबतची कल्पना साखरपा पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी श्वान पथक, ठसे तज्ञ फॉरेन्सिक यांना पाचरण करण्यात आले. यावेळी डी .वाय .एस .पी. सुरेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या असून चोरीचा छडा लावण्यासाठी साखरपा पोलीस वरिष्टांच्या मार्गदर्शना खाली तपास करीत आहेत. यावेळी पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्य्क पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉनस्टेबल नितीन जाधव, महिला पोलीस मनस्वी पावसकर आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg