loader
Breaking News
Breaking News
Foto

त्रिपुरारीच्या चांदण्यात सावंतवाडीकर "हे चांदणे फुलांनी..." मैफिलीने मंत्रमुग्ध

सावंतवाडी : श्री सद्गगुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व भाजप नेते श्री विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून सलग आठव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती- संकल्पनेतून हे चांदणे फुलांनी.... जुन्या नव्या हिंदी मराठी गीतांचा सदाबहार नजराणा या संगीत कार्यक्रमाचे आयोजन बुधवाी जनरल जग्गनाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री श्रीपाद चोडणकर, सौ. मंजिरी धोपेश्वरकर,श्री सोमा सावंत व श्री वैभव केंकरे यांच्या हस्ते दीपप्रजवलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. विद्यालयाचा माजी विद्यार्थी व कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा फेम सागर मेस्त्री यांच्या सोबतच विद्यालयाच्या सौ वर्षा देवण - धामापुरकर, ॲड सिद्धी परब, कु समृद्धी सावंत, कु मधुरा खानोलकर, कु केतकी सावंत, कु निधी जोशी, श्री नितिन धामापूरकर, कु भास्कर मेस्त्री या विद्यार्थ्यांनी मोसे छल किये जाये, निगाहे मिलाने को जी चाहता है, प्यार हुआ इकरार हुआ, सलामे इष्क, मी वाऱ्याच्या वेगाने आले, सोचेंगे तुम्हे प्यार, मल्हार वारी, प्रीतीच्या चांद राती, राधा ही बावरी यासारखी एकाहून एक सरस गीते सादर करत रसिकांना खिळवून ठेवले तर सौ.पूजा सावंत यांच्या नृत्याने वन्स मोअर मिळवत कार्यक्रमास अधिकच रंगत आणली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला साथसंगत श्री निलेश मेस्त्री (हार्मोनियम) , श्री किशोर सावंत व कु सिद्धेश सावंत(तबला) कु निरज मिलिंद भोसले (तबला/ढोलक), श्री अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), कु. मंगेश मेस्त्री (सिंथेसायझर), कु दुर्वा सावंत (गिटार) व सूत्रसंचालन श्री संजय कात्रे तर ध्वनी संयोजन श्री सुभाष शिरोडकर यांनी केले. सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी अर्ध्याहुन अधिक कार्यक्रमास उपास्थिती दर्शवत सर्व कलाकारांना दाद दिली व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेवक श्री सुधीर आडीवरेकर, श्री हेमंत खानोलकर, श्री सोमा सावंत, श्री तानाजी सावंत, कु गोविंद मळगावकर यांचे विशेष सहकार्य लाभले तर मालवणी कवी श्री दादा मडकईकर, डॉ. गोवेकर, श्री विनोद गावकर, श्री सुधीर धुमे, श्री अरुण मेस्त्री, सौ. उत्कर्षां मेस्त्री, श्रीम. मानसी भोसले, डॉ. संगीता तुपकर, सौ. पूजा दळवी,सौ सरिता सावंत, सौ अनामिका मेस्त्री यांच्या सह अनेक मान्यवर मंडळींनी व जिल्हाभरातील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेवटच्या सादरीकणापर्यंत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg