loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक कार्यकर्ते संजय शितप यांना आरोग्य सेवारत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी (जमीर खलफे) - रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावचे सुपुत्र व लोकनेते शामराव पेजे सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष आणि निःस्वार्थी सामाजिक कार्यकर्ते संजय गोपाळ तथा पांडुशेठ शितप यांना नुकतेच रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १५ व्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, कुणबी मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव, प्रदेश सचिव प्रा. गोपीनाथ सगर यांच्या हस्ते राज्यस्तरीय आरोग्य सेवारत्न नागरी पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले. संजय शितप यांनी मागील अनेक वर्षे खंडाळा परिसरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात लोकनेते शामराव पेजे सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था आणि या संस्थेसह विविध संस्थांच्या माध्यमातून सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत, ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कार्य केले आहे. कोविड - १९ काळात त्यांनी खंडाळा परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच सातत्याने आरोग्य तपासणी शिबीरे, रक्त तपासणी शिबीरे, नेत्र तपासणी शिबीरे यासह विविध माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी ते तत्पर असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्ह्यातील खंडाळा भागात सर्वसामान्य लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध न झाल्यास, अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई इत्यादी ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अनेक संस्थांच्या माध्यमातून अशा गोर - गरीब लोकांना ते मदत करत असतात. कोणत्याही मान - सन्मानाशिवाय ते सतत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात. शाळा - महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य साधने वाटप, गरजूंना आवश्यक साहित्याचे वाटप करणे ही कामे करत असतात. आरोग्य सेवेसह सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत. विद्यार्थी गुणवत्ता विकास, महिला सक्षमीकरण आणि समाज विकासात ते सदैव विविध उपक्रमाचे आयोजन करता असतात. त्यांच्या याच कार्यावर प्रभावित होऊन महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेने त्यांना राज्यस्तरीय आरोग्य रत्न नागरी पुरस्कार प्रदान केला आहे.

टाइम्स स्पेशल

त्यांना यापूर्वी कोविड योद्धासह अन्य सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच ते विविध संघटनांच्या पदांवर कार्यरत असून त्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच त्यांच्या पुरस्कार वितरण प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कोकणचे गाडगेबाबा मारुतीकाका जोशी, त्यांचे मार्गदर्शक यशवंत निंबरे, सामाजिक कार्यकर्ते विकास पेजे, अरुण मोर्ये, महादेव आग्रे, यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. एका निःस्वार्थी आणि प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्याला राज्यस्तरीय आरोग्य सेवा रत्न पुरस्कार प्रदान केल्याबद्दल सर्व स्तरातून महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेला धन्यवाद दिले जात असून, संजय शितप यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg