loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ.शशिकांत गायकवाड अपरांत हॉस्पिटल येथे फिजिशियन म्हणून रुजू

संगलट खेड (इक्बाल जमादार) - चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागातील अपरांत सुपर स्पेशालिटी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डॉ शशिकांत गायकवाड हे वरीष्ठ डॉक्टर पूर्ण वेळ फिजिशियन म्हणून नुकतेच रूजू झाले आहेत. त्यांनी मुंबई च्या प्रतिष्ठीत जे जे हॉस्पिटल मधून एम.डी. मेडीसिन ही अर्हता प्राप्त केली असून, क्षयरोग व छातीचे विकार या मध्ये विशेष प्रशिक्षण(DTDC) घेतलं आहे. मागील 30 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत ययानी ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, चेस्ट हॉस्पिटल पुणे, रुबी हॉस्पिटल पूणे या सारख्या नामांकित हॉस्पिटल मध्ये हजारों रुग्णांवर यशस्वी उपचार दिले आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये डॉ शशांक जोशी. डॉ फारूख उडवाडीया डॉ.बि. के. गोयल. डॉ पि .के. ग्रँट, डॉ ओ.पी. कपूर,डॉ अस्पि गोलवाला व डॉ प्राची साठे या सारख्या वैद्यकीय ‌‌ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक विभूतींसोबत काम केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डायबिटीस, हदयरोग, मेंदूचा झटका, स्थूलत्व या सारख्या आजारावर उपचार करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असुन 2 डी इको तपासणी मध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. अपरांत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सेवेमुळे हृदयविकार ते जटील श्वसनरोगापर्य॑तच्या सर्व उपचारांसाठी चिपळूण वासियांना एक सक्षम व कुशल पर्याय उपलब्ध होणार आहे. अपरांत हॉस्पिटल गेली सात वर्षे चिपळूणच्या जनतेला गुणवत्ता पूर्ण, तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करतआहे. याच अभियानांतर्गत डॉ गायकवाड यांची नेमणूक करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

डॉ शशिकांत गायकवाड यांचे स्वागत प्रसंगी हास्पिटलचे डायरेक्टर डॉ यतिन जाधव व कार्यकारी डायरेक्टर डॉ अब्बास जबले उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या येण्याचं स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व चिपळूणवासीयांसाठी एक ज्येष्ठ व अनुभवी कन्सल्टंट प्राप्त झाला याबद्दल समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg