loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचा जोर; पहिल्या दिवशी ५ उमेदवारी अर्ज दाखल

​सावंतवाडी (प्रतिनिधी) -सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जोरदार 'एंट्री' करत एकूण ५ उमेदवारी अर्ज दाखल केले. ​दाखल झालेल्या ५ अर्जांमध्ये नगराध्यक्षपदासाठी १ आणि नगरसेवक पदासाठी ४ अर्जांचा समावेश आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी सीमा मठकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगरसेवक पदासाठी शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, समिरा खलिल, कृतिका कोरगावकर आणि संदीप वेंगुर्लेकर यांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. ​निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी या ५ उमेदवारी अर्जांची माहिती दिली. अर्ज दाखल करताना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, शहर संघटक निशांत तोरसकर, उमेश कोरगावकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत, भाजप, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी चौकशी केली असली तरी, अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg