loader
Breaking News
Breaking News
Foto

पाणी मागण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र चोरणारे तिघे जेरबंद!

​सावंतवाडी (प्रतिनिधी) – ​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात आंबोली नांगरतास येथे पाणी मागण्याच्या बहाण्याने एका ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेणाऱ्या तीन अज्ञात इसमांना सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी (तालुका हातकणंगले) येथून ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि चोरलेले सोने लवकरच हस्तगत करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​आंबोली नांगरतास येथील मायकल डिसोजा यांच्या फॉर्म हाऊसवर काम करणाऱ्या श्रीमती सुहासिनी बाळकृष राऊत (वय ६०) यांच्यासोबत ही घटना घडली. काल बुधवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास आंबोलीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून एक इसम उतरला. त्याने श्रीमती राऊत यांच्याकडे प्लास्टिकच्या बाटलीत पाणी मागितले. त्यांनी पाणी दिल्यावर, बाटली भरून गाडीकडे जाताना त्या इसमाने अचानक त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. मंगळसूत्र तुटल्यामुळे अर्धे खाली पडले, तर सुमारे ६० हजार रुपये किंमतीचा उर्वरित भाग घेऊन तो इसम गाडीत बसला. त्याचे अन्य दोन साथीदार लगेच गाडी कोल्हापूरच्या दिशेने घेऊन पळून गेले.

टाइम्स स्पेशल

सुहासिनी राऊत यांच्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध मंगळसूत्र हिसकावून चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ​गुन्हा दाखल होताच, पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री संतोष गलोले, रामदास जाधव, गौरव परब आणि सचिन चव्हाण यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. ​अतिशय जलद गतीने तपास करत, पोलिसांनी हुपरी पोलीस ठाणे (हातकणंगले) येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अवघ्या १२ तासांच्या आत तिन्ही आरोपींचा माग काढला. या प्रकरणी ​अकबर साहेबजी दरवेशी (वय २४ वर्षे, रा. शाहूनगर रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) ​चंद्रकांत प्रभाकर गायकवाड (वय ३४ वर्षे, रा. बिरदेव रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) ​राकेश विजय कंगणे (वय ३४ वर्षे, रा. शाहूनगर, हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) ​या तिन्ही आरोपींना आज, गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दि. १० नोव्हेंबरपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे. ​पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले, "गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने पथके रवाना करण्यात आली. केवळ १२ तासांत आरोपींना पकडणे हे आमच्या टीमच्या कठोर मेहनतीचे फलित आहे. लवकरच चोरीस गेलेले सोने आणि गुन्ह्यात वापरलेली गाडीही जप्त करण्यात येईल."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg