loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली विधानसभा मतदारसंघ दत्तक घ्या; माजी आ. सूर्यकांत दळवी यांची निरंजन डावखरे यांना विनंती

खेड (प्रतिनिधी) : दापोली विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षासाठी पुन्हा मजबूत करायचा असेल, तर या मतदारसंघाला दत्तक घेऊन संघटनबांधणीला नवे बळ द्यावे, अशी विनंती दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांना केली. खेड शहरातील महाड नाका भाजपा अल्पसंख्याक विभागाच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दळवी म्हणाले, “1990 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेनेतून उभा राहिलो, तेव्हा मुस्लिम समाज शिवसेनेपासून दूर होता. पण मी संवाद साधला, विश्वास निर्माण केला आणि तेव्हापासून हा समाज माझ्यासोबत उभा राहिला. आजही त्यांच्यात परिवर्तन होताना दिसत आहे. आता हेच परिवर्तन भारतीय जनता पक्षामध्ये दिसावे, पक्षाने त्यांना योग्य न्याय आणि प्रतिनिधित्व दिले पाहिजे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज रहीम सईबोले नगरसेवक म्हणून निवडून आले आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक आघाडी मिळाली असे स्पष्टपणे जाहीर केले. यावेळी बोलताना दळवी यांनी दापोली मतदारसंघाचे भविष्यातील राजकीय समीकरण अधोरेखित केले. “पक्षाने जर तुम्हाला जबाबदारी दिली, तर तुम्ही हा मतदारसंघ दत्तक घ्या. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे जो पाया घातला, त्यावर पुन्हा एक मजबूत आघाडी उभी राहू शकते. तुम्ही किंवा वैभव खेडेकर आमच्या सोबत उभे राहिलात तर हा बदल अधिक वेगाने घडेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. खेड शहरातील विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी “कोकणात सर्वात जास्त रस्त्यांची दुर्दशा कुठे दिसेल तर ती खेडमध्ये दिसते. मंत्री येणार म्हणून अर्धा रस्ता रातोरात झाला. मग नगरपंचायत आपल्या हातात आली, तर शहराचा कायापालट होण्यासाठी वेळ लागणार नाही,” असे ते म्हणाले.

टाइम्स स्पेशल

यावेळी त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या राजकीय समीकरणावर संकेत देत वैभवी खेडेकर यांचा उल्लेख "भावी नगराध्यक्षा" असा केला. “युती झाली तर नगराध्यक्ष पद भाजपकडेच असावे आणि युती झाली नाही, तरी आपण अहोतच असे सांगत खेळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर थेट दावा केल्याचे देखील पाहावयास मिळेल. राजकीय स्फोटाची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात नेहमी खेडपासूनच होते. यंदा हा स्फोट भाजपच्या बाजूने होईल, आणि तुम्हाला नगराध्यक्ष पदाच्या मिरवणुकीकरता वेळ राखून ठेवायला सांगतो,” असे दळवी म्हणाले. आमदार निरंजन डावखरे, भाजपा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रहीम सईबोले, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, वैभवी खेडेकर, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रेडीज यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg