loader
Breaking News
Breaking News
Foto

ओमकार हत्तीला नैसर्गिक अधिवासात सोडा - मडुरा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मागणी

बांदा : (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुक्यातील बांदा, इन्सुली, वाफोली, कास, मडुरा, सातोसे, रोणापाल, भालावल, सरंबळे या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून ओमकार नावाचा वन्य हत्ती ठाण मांडून असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या हत्तीला रोखण्यासाठी वन विभाग व पोलीस कर्मचारी सुतळी बॉम्ब, लाठीचार्ज करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे हत्ती अधिक आक्रमक झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे, कास सरपंच प्रविण पंडित, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब आणि माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर यांनी निवेदन सादर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यांनी ओमकार हत्तीला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी केली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी यांना देण्यात आल्याचे गुरुदास गवंडे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने प्रती हेक्टरी आठ हजार रुपये मदत जाहीर केली असली तरी शेजारच्या गोवा राज्याने प्रती हेक्टरी चाळीस हजार रुपये दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अन्याय होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg