loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार भैय्या सामंत यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेमुळे माजी सरपंचाचे प्राण वाचले

देवळे (प्रकाश चाळके) - राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी नुकतीच म्हणजे आठ दिवसापूर्वी दाभोळे जिल्हा परिषद गटासाठी रुग्णवाहिनी उपलब्ध करून दिली आहे, मात्र या रुग्णवाहिनीमुळे मेघी गावच्या माजी सरपंचांचे प्राण वाचले. मेघी गावचे माजी सरपंच बबन करंबेळे यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रात्री ९.४५ च्या सुमारास देवळे येथील डॉ.मांगलेकर यांचे दवाखान्यात आणले असता डॉ.मांगलेकर यांनी प्राथमिक तपासणी करीत असतानाच पक्षाघाताचा तीव्र झटका आला. डॉ.मांगलेकर यांनी गावातील कार्यकर्त्यांना संपर्क साधला असता कार्यकर्त्यांनी तत्परतेने सदर रुग्णास रत्नागिरी येथील चिरायू हॉस्पिटल येथे अवघ्या ३५ मिनिटात दाखल केले. प्रसंग गंभीर होता. काही वेळेतच पोहचणे गरजेचे होते. परंतु युवा सेना शाखा प्रमुख समीर आंब्रे यांनी तत्परतेने रुग्णवाहिका स्वतः चालवून सेवा उपलब्ध करून दिली. मेघी गावचे माजी सरपंच बबन करंबळे यांना ४० किलोमीटर अंतर अवघ्या ३५ मिनिटात कापून समीर आंब्रे यांनी योग्य उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले त्यामुळे बबन करंबेळे यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने मोठा बाका प्रसंग टळला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार भैय्या सामंत यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेमुळे रुग्णास पुढील उपचार वेळेत मिळाले. सदर सेवेसाठी देवळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आमदार सामंत यांचे अनंत ऋणी असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ पुढार्‍यांनी कधीही अशी सेवा दिली नव्हती मात्र भैय्या सामंतांच्या रूपाने जनतेला मोठा आधाराचा आमदार मिळाल्याचे बोलले जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg