loader
Breaking News
Breaking News
Foto

तिसंगी येथील जंगलात अवैध दारुभट्टीवर पोलिसांची धाड, ७५ हजारांच्या मुद्देमालासह एकावर गुन्हा

खेड (वार्ताहर) : - तालुक्यातील तिसंगी गावाच्या जंगलमय परिसरात कार्यरत असलेल्या अवैध व बेकायदेशीर गावठी दारू भट्टीवर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२:२० वाजता ही कारवाई करण्यात आली. धाडीत पोलीसांनी अंदाजे २००० लिटर गुळमिश्रित थंड रसायन, उकळते गरम रसायन, अल्युमिनियमचे भांडे आदी साहित्य असा एकूण ७५,०००/- रुपये किंमतीचा माल जप्त करून नष्ट केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रकरणी रोशन सुभाष भोसले (वय ३५, रा. तिसंगी, पिंपळवाडी, ता. खेड) याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 343/2025 ,अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम 2023 चे कलम ६५ (ब), (क), (ड), (फ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस कर्मचारी नितीन रामदास चव्हाण यांनी खेड पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg