loader
Breaking News
Breaking News
Foto

बेकायदा दारू वाहतूक विरोधातील कारवाईत १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा (प्रतिनिधी) - गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात केल्या जाणाऱ्या बेकायदा दारू वाहतूक विरोधात बांदा पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ₹१७ लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ₹२ लाख ५९ हजार २०० रुपयांची विदेशी दारू व ₹१५ लाखांची इनोव्हा क्रिस्टा चारचाकी असा माल मिळून आला आहे. या प्रकरणात कणकवली तालुक्यातील चार तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बांदा–शेर्ले पुलाजवळ करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांदा पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती की, बांदा परिसरातून बेकायदा दारू वाहतूक होणार आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा आळवाडा रस्त्यावर सापळा रचण्यात आला. यावेळी एमएच ०८ एजी १२२१ ही इनोव्हा क्रिस्टा चारचाकी संशयास्पदरीत्या जाताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या सीलबंद प्लास्टिक बॉटल्सचे एकूण ६० बॉक्स (४८ बॉटल्स प्रत्येकी बॉक्स) आढळून आले. प्रत्येक बॉटलची किंमत सुमारे ₹९० इतकी असून, एकूण ₹२ लाख ५९ हजार २०० इतक्या किंमतीचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. गाडीची किंमत सुमारे ₹१५ लाख इतकी असल्याने, मिळून ₹१७ लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी राजकुमार श्रीकांत जाधव (२०), अंकुर श्रीकांत जाधव (२३), सोहम स्वप्निल पाताडे (२१) आणि शुभम संतोष ठाकूर (२२) (सर्व रा. कणकवली तालुका) या चौघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे आणि उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवस, तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार, प्रसाद पाटील आणि राजाराम कापसे यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गवस करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg