loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत काव्य व गजल संमेलन उत्साहात

दापोली - मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल दापोली व ललित कला फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली शहरातील श्री मंगल कार्यालयामध्ये काव्य व गझल संमेलनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या काव्य व गझल संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी भूषविले तर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ.शीतल मालुसरे होत्या. प्रशालेचे माजी शिक्षक प्रसिद्ध उर्दू, मराठी गझल व काव्य निर्मिती करणारे बदीऊजमा खावर यांचे स्मरण करून त्यांनी लिहिलेल्या गझल व काव्याचे वाचन याप्रसंगी करण्यात आले. या संमेलनात उर्दू, मराठी, हिंदी मधील काव्य व गजलींचे गायन करण्यात आले. उर्दू साहित्याचे गाढे अभ्यासक मंजर खयामी, जमालुद्दीन बंदरकर, बदरुद्दीन बदर, बशीर अहमद बशीर, सलमान मोमीन, रिजवान कारीगर, जियाऊरहमान खान जिया या साहित्यिकांनी मुशायरा व गजलींचे गायन करत प्रेक्षकांची दाद मिळवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशालेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या कवितेचे व गजलींचे सादरीकरण केले. मराठी व हिंदी साहित्यिकांमध्ये प्रा.डॉ.बाळासाहेब लबडे, कैलाश गांधी, रेखा जगरकर आदि साहित्यिकांनी आपापल्या कविता व मराठीतील गजलींचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. शिक्षक व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदेचे वाचन करत काव्य, गझलींची नवनिर्मिती करत पुन्हा या भाषांना चकाकी देण्याचे कार्य या युवा पिढीने करावे असे प्रतिपादन साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लबडे यांनी केले. उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कौतुक करत अशा प्रकारच्या काव्य व गजलींच्या संमेलनाचे आयोजन वारंवार करावे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये साहित्य विषयी गोडी निर्माण होईल असे उद्गार इकबाल परकार यांनी काढले. प्रशालेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या कवितेचे व गजलींचे सादरीकरण केले. मराठी व हिंदी साहित्यिकांमध्ये प्रा.डॉ.बाळासाहेब लबडे, कैलाश गांधी, रेखा जगरकर आदि साहित्यिकांनी आपापल्या कविता व मराठीतील गजलींचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. शिक्षक व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदेचे वाचन करत काव्य, गझलींची नवनिर्मिती करत पुन्हा या भाषांना चकाकी देण्याचे कार्य या युवा पिढीने करावे असे प्रतिपादन साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लबडे यांनी केले. उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कौतुक करत अशा प्रकारच्या काव्य व गजलींच्या संमेलनाचे आयोजन वारंवार करावे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये साहित्य विषयी गोडी निर्माण होईल असे उद्गार इकबाल परकार यांनी काढले.

टाइम्स स्पेशल

या संमेलनास मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, सचिव इकबाल परकार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, कॉलेज समितीचे अध्यक्ष आरिफ मेमन, सदस्य नाझीम काझी, हमीद बांगी, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य खतीब, यू.ए.दळवी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अमरा रखांगे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रणय इंगळे व नंदिनी काळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान मोमीन व नंदिनी काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सादिक मुजावर व रियाज अहमद म्हैशाळे यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg