loader
Breaking News
Breaking News
Foto

संपूर्ण विहुले गावाने एकमुखी निर्णय घेऊन केला भाजपामध्ये जाहीर पक्ष प्रवेश

बोरघर माणगाव (विश्वास गायकवाड) - साई पंचायत समिती गणांतर्गत विहुले गावातील काही ग्रामस्थांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर उर्वरित ग्रामस्थांनी देखील विकासाच्या वाटेवर जाण्याचे निश्चित करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार तथा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील, आमदार प्रशांतदादा ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, लोकसभा प्रमुख सतीश धारप, माजी राजीप अध्यक्ष आस्वादशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन संपूर्ण गावाने एकमुखी निर्णय घेऊन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर महाडिक यांच्यासमवेत गावचे अध्यक्ष व गावाकमिटी, मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष व कमिटी आणि ग्रामस्थ यांनी भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रमोद गणपत महाडीक अध्यक्ष, विहुले उत्कर्ष मंडळ मुंबई चंद्रकांत बालाजी कठे उपाध्यक्ष, विहुले उत्कर्ष मंडळ मुंबई गजानन विठोबा दळवी सचिव, विहुले उत्कर्ष मंडळ मुंबई विजय शंकर महाडीक, अध्यक्ष, ग्रामस्थ मंडळ विहुले, समिर सुभाष महाडीक, सचिव, ग्रामस्थ मंडळ तथा सदस्य, ग्रामपंचायत विहुले, विश्वास केशव महाडीक, ग्रामस्थ, प्रशांत पंढरीनाथ महाडीक ग्रामस्थ, अरविंद मोतीराम दळवी ग्रामस्थ, सुभाष तुकाराम दळवी ग्रामस्थ, मधुकर दामोदर महाडीक यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी माणगाव तालुकाध्यक्ष परेश सांगले, उपाध्यक्ष सुधीरजी म्हामुणकर, साई विभाग उपाध्यक्ष निलेश दळवी, जनार्दन महाडिक उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे संघटनेला साई विभागात अधिक बळकटी मिळाली असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटीबद्ध असल्याचे विभागीय उपाध्यक्ष निलेश दळवी यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg