loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना फिरत्या प्रयोगशाळेतून मिळाले विज्ञानाचे धडे

खेड - (प्रतिनिधी) - गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ विरुधुनगर तर्फे रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये इयत्ता 6वी ते 10च्या विद्यार्थ्यांनी फिरती प्रयोगशाळा या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून विज्ञानाचे धडे गिरवले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम प्रमुख मान्यवर इथयम जिंजली ऑईलचे मुख्य प्रयोजक मुठू, प्रकल्प अध्यक्ष वाडीवेल, परिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे अन्न शास़्त्रज्ञ पशुपती, नवीन कुमार, सतीश कुमार यांचे संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे व शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फिरती प्रयोगशाळा हा एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आहे. याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, विज्ञानाचे ज्ञान प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे देणे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा आहे. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख मान्यवर नवीन कुमार यांनी विद्यार्थ्यांना प्रथम विज्ञानाची ओळख करून दिली. विज्ञान म्हणजे काय ? विज्ञानाची व्याप्ती, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे विज्ञान लपलेले आहे ते विविध प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनातील विविध शंकांचे समाधान करत आयोजित कार्यक्रमातील विविध प्रयोगांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

टाइम्स स्पेशल

यावेळी प्रशालेचे उच्चमाध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित प्रमुख मान्यवरांचे आभारपत्र देऊन आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधी भोसले यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg