loader
Breaking News
Breaking News
Foto

बिहार मतमोजणीच्या निकालामध्ये मोठा बदल,जेडीयू भाजपच्या पुढे...

बिहार विधानसभा निवडणुक 2025 ची मतमोजणी आज 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता सुरू होईल. बिहारमध्ये एकूण 66.91% मतदान झाले असून, ज्यामध्ये 62.8% पुरुष आणि 71.6% महिला मतदारांनी मतदान केले. बिहारमध्ये कोणाची सत्ता असेल हे आजच्या निकालानंतर स्प्ष्ट होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बिहार विधानसभा निवडणुक 2025 ची मतमोजणी आज 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता सुरू होईल. पहिले ट्रेंड सकाळी 8.30 च्या सुमारास अपेक्षित आहेत या निवडणुकीच्या निकालाचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल. यावेळी, पोस्टल मतपत्रिका मोजण्याची पद्धत बदलली असून, त्यामुळे मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्यांपूर्वी पोस्टल मते समाविष्ट केली जातील. सर्व निकाल संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. बिहारमध्ये एकूण 66.91% मतदान झाले असून, ज्यामध्ये 62.8% पुरुष आणि 71.6% महिला मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाने 1951 नंतरचे हे सर्वाधिक मतदान असल्याचे नोंदवले आहे. राज्यात पार पडललेया दोन टप्प्यांच्या निवडणुकीत 8.5 लाखांहून अधिक मतदान कर्मचारी, 2,616 उमेदवारांनी नियुक्त केलेले 1.4 लाखांहून अधिक मतदान एजंट, 243 सामान्य निरीक्षक आणि 38 पोलिस निरीक्षक सहभागी होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg