loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवटपाल येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा

खेड (वार्ताहर) : - तालुक्यातील पंधरागाव–धामणंद विभागातील तळवटपाल येथील देऊळवाडी परिसरात अवैध हातभट्टीच्या दारू तयार करण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाल्यानंतर गुरुवारी (दि. 13 नोव्हेंबर) दुपारी विशेष पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. धाडीत संशयित गणेश चंदराव पालांडे (वय 60, रा. तलवटपाल) हा व्यक्ती गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन व साहित्य स्वतःच्या ताब्यात ठेवत असल्याचे आढळले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी त्याच्याकडून 34 लिटर क्षमतेचे गावठी दारूचे रसायन (किंमत 4,000 रु.) तसेच 20 रुपये किमतीचे साहित्य असा एकूण 4,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयिताविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अन्वये खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस शिपाई प्रशांत विनायक वाघ यांनी नोंदवली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg