loader
Breaking News
Breaking News
Foto

रायपूर छत्तीसगड येथील २४० कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात

रायपूर (छत्तीसगड) : आमिष दाखवून वा फसवून अन्य धर्मात गेलेल्या २४० कुटुंबांना विधिवत पुन्हा वैदिक सनातन हिंदू धर्मात घेण्यात आले. श्रीमद नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली येथे विधिवत हा सोहळा झाला. जगद्गुरूश्रीमुळे आजपर्यंत १,५२,५९४ लोकांनी हिंदू धर्म पुनर्प्रवेश केला आहे. हिंदू धर्मबांधवाना सुनियोजित षड्यंत्राद्वारे विविध आमिषे दाखवून, भुलथापा देऊन, त्यांच्या अज्ञानाचा, गरिबीचा गैरफायदा घेऊन, त्यांचे धर्मांतरण करण्यास भाग पाडले जात आहे. अशा धर्मांतरीत हिंदूंना पुन्हा हिंदुधर्मात आणण्यासाठी रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम या पिठाची धार्मिक विंग यासाठी कार्य करत असते. ज्यावेळी परधर्मात गेलेल्या व्यक्तींना कुटुंबांना आपण पर धर्मात गेल्याची जाणीव होते त्यावेळी पुनश्च स्वधर्मात येण्याची इच्छा असते. अशा कुटुंबांना पुन्हा घरवापसी सोहळ्याने विधिवत धर्मप्रवेश देण्याचे महाअभियान श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य. यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे. असा सोहळा गुडियारी रायपूर छत्तीसगड येथे झाला. यावेळी २४० कुटुंबांनी स्वधर्मात प्रवेश केला आहे .३ तास हा विधी सुरू होता. त्यात प्रायचित्त विधान, शुद्धीकरण, भगवान विष्णुपूजन, गोमाता पूजन, होम हवन इत्यादी विधी झाले. या सर्व बांधवांना शपथ देण्यात आली. जगद्गुरूंनी ही शपथ दिली. ती अशी - यापुढे मी हिंदू धर्माची उपासना, रीतिरिवाज प्रथा परंपरा यांचे तंतोतंत पालन करेन. यापुढे मी अन्य धर्मात जाणार नाही. मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदू म्हणून जगेन. त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यांनी राम नामाची दीक्षा देऊन गळ्यात कंठी घातली आणि हिंदू धर्म संस्कृती, संस्कार याबाबत उचित असे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ईसाई मिशनरी वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून हिंदुधर्मीय लोकांचा बाप्तिस्मा करतात. त्यांचे धर्मांतर करून घेत आहेत. त्यातील बरीचशी मंडळी आदिवासी आहेत. धर्मांतरण केलेल्या नागरिकांचे मूळचे नाव बदलत नाहीत. तसेच त्यांची जात आणि धर्म सोयीसुविधा मिळण्यासाठी न बदलता त्यांचे ख्रिश्चनीकरण करण्याचे काम सुरू आहे. ज्या लोकांना हिंदू धर्मातील उपासना पद्धती बदलल्यामुळे अपराधी वाटत होते, ते आम्हाला येऊन भेटले. म्हणून आम्ही आता त्यांना पूर्वीची उपासनापद्धती सुरू करून दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

असा सोहळा गुडियारी रायपूर छत्तीसगड येथे झाला. यावेळी २४० कुटुंबांनी स्वधर्मात प्रवेश केला आहे .३ तास हा विधी सुरू होता. त्यात प्रायचित्त विधान, शुद्धीकरण, भगवान विष्णुपूजन, गोमाता पूजन, होम हवन इत्यादी विधी झाले. या सर्व बांधवांना शपथ देण्यात आली. जगद्गुरूंनी ही शपथ दिली. ती अशी - यापुढे मी हिंदू धर्माची उपासना, रीतिरिवाज प्रथा परंपरा यांचे तंतोतंत पालन करेन. यापुढे मी अन्य धर्मात जाणार नाही. मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदू म्हणून जगेन. त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यांनी राम नामाची दीक्षा देऊन गळ्यात कंठी घातली आणि हिंदू धर्म संस्कृती, संस्कार याबाबत उचित असे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ईसाई मिशनरी वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून हिंदुधर्मीय लोकांचा बाप्तिस्मा करतात. त्यांचे धर्मांतर करून घेत आहेत. त्यातील बरीचशी मंडळी आदिवासी आहेत. धर्मांतरण केलेल्या नागरिकांचे मूळचे नाव बदलत नाहीत. तसेच त्यांची जात आणि धर्म सोयीसुविधा मिळण्यासाठी न बदलता त्यांचे ख्रिश्चनीकरण करण्याचे काम सुरू आहे. ज्या लोकांना हिंदू धर्मातील उपासना पद्धती बदलल्यामुळे अपराधी वाटत होते, ते आम्हाला येऊन भेटले. म्हणून आम्ही आता त्यांना पूर्वीची उपासनापद्धती सुरू करून दिली आहे.

टाइम्स स्पेशल

२४० कुटुंबांनी घरवापसी केलेली आहे. या सोहळ्यास जसपूर परगाण्याचे छत्रपती प्रबळ प्रतापसिंह जुदेव स्वतः उपस्थित होते. जगद्गुरु रामानंदाचार्यांनी ज्या कुटुंबांना हिंदू धर्मात पुनर्प्रवेश दिला त्या कुटुंबाचे छत्रपती महाराज प्रबळ प्रताप सिंह जुदेव यांनी स्वतः त्यांचे पाय धुवून त्यांचे मोठ्या सन्मानपूर्वक हिंदू धर्मात स्वागत केले. त्याचबरोबर अनेक संत महंत सुद्धा उपस्थित निळकंठमहाराज, संत श्री युधिष्ठिर लालजी, स्वामी राजेश्वर आनंद, महंत देवादास, दीपक लखोटिया आदी उपस्थित होते. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे घर वापसी कार्य पाहून छत्रपती प्रबळ प्रतापसिंह जुदेव हे अत्यंत प्रभावी झाले त्यांनी जगद्गुरुश्रीना शब्द दिला आहे. यापुढे आपण ज्या ज्या वेळी घर वापसी कार्यक्रम कराल त्या त्यावेळी मी स्वतः जातीने उपस्थित राहीन. त्यांचे पूज्य पिताजी छत्रपती प्रताप सिंह जुदेव यांनीही हे धर्मांतर रोखण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि तीच परंपरा आता विद्यमान छत्रपती आदरणीय प्रबळ प्रताप सिंह जुदेव करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून सोहळा

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg