loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत १६ नोव्हेंबरला मोफत महाआरोग्य शिबीर

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि आरजी स्टोन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे भव्य मोफत महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत सल्ला आणि मोफत तपासणी सुविधा उपलब्ध असणार आहे. डॉ. रूत्वीज पाटणकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या ​दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत राणी पार्वती देवी हायस्कूलचे सभागृह, सावंतवाडी या ठिकाणी महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​डॉ. पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरात खालील आरोग्य समस्यांवर मोफत सल्ला उपलब्ध असेल:​ मुतखडा, ​प्रोस्टेट ग्रंथीचे आजार,​पित्ताशयातील खडे, हर्निया,​ मूळव्याध ,​ओव्हरीयन सिस्ट, ​गर्भाशयाच्या गाठी ​तसेच, आहारतज्ञांचा मोफत सल्ला उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, रुग्णांसाठी काही मोफत तपासण्या देखील केल्या जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी ​डोळे तपासणी,​हिमोग्लोबिन तपासणी,​रक्त शर्करा,​युरोफ्लोमेट्री तपासणी केली जाईल.​जन्मभूमीतील लोकांसाठी उपक्रम हाती घेतला आहे असे ​डॉ. पाटणकर यांनी सांगितले ते म्हणाले की, गोवा मेडिकल कॉलेजमध्ये काम केल्यानंतर आता मी आरजी स्टोन हॉस्पिटलशी जोडलो गेलो आहे. माझ्या जन्मभूमीतील लोकांना या उपक्रमाचा फायदा व्हावा, या उद्देशाने आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे.

टाइम्स स्पेशल

​या शिबिरानंतर, सावंतवाडीतील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणाही डॉ. पाटणकर यांनी केली. आरजी स्टोनच्या माध्यमातून सावंतवाडीत पाटणकर गॅस एजन्सी शेजारी दर रविवारी ओपीडी (OPD) देखील सुरू केली जाणार आहे, ज्यामुळे येथील लोकांना आरोग्य सेवा नियमितपणे उपलब्ध होईल. ​यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला डॉ. भावेश पटेल, ॲड. रूजूल पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.​शिबिराचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg