loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या खेळाडूंची राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड!

रत्नागिरी: महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या १५व्या राज्यस्तरीय सब-ज्युनियर डॉजबॉल स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाने चमकदार कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ‘दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे’ या शाळेतील तीन गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हे खेळाडू येत्या १४ ते १७ नोव्हेंबर दरम्यान गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. ​पिंपरी-चिंचवड, पुणे येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक स्कूल, खराळवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरीच्या मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही संघांनी अत्यंत जोशपूर्ण खेळ करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये 'दि मॉडेल इंग्लिश स्कूल'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मुलांच्या संघातून पूजन रमेश धातकर याची निवड झाली आहे, तर मुलींच्या संघात नंदिनी रवींद्र जाधव आणि धनश्री नारायण बळकटे या दोन प्रतिभाशाली खेळाडूंची निवड झाली आहे. या तिन्ही खेळाडूंनी ग्रामीण पार्श्वभूमीवर असूनही खेळाप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि मेहनत या बळावर राष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे.

टाइम्स स्पेशल

ग्रामीण भागातील असूनही 'दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे' या प्रशालेने आजवर अनेक दर्जेदार खेळाडू घडवले आहेत, ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवला आहे. या यशात प्रशालेच्या मार्गदर्शक शिक्षिका जाधव मॅडम यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी खेळाडूंना केलेले योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून सातत्याने करून घेतलेला सराव यामुळेच हे यश संपादन करता आले आहे. ​राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा आणि मार्गदर्शक शिक्षिका जाधव मॅडम यांचा प्रशालेच्या वतीने नुकताच सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्यांचे शाल, श्रीफळ देऊन कौतुक करण्यात आले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. रत्नागिरीच्या या खेळाडूंकडून राष्ट्रीय स्तरावरही उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg