loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणमध्ये दिग्गज नेत्यांची बैठक, महायुतीवर शिक्कामोर्तब! ‘सकाळी इकडे व रात्री तिकडे’ चालणार नाही : ना. उदय सामंत

चिपळूण (स्वप्निल घाग) - चिपळूण येथे आज महायुतीच्या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुती एकजुटीने लढणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते व पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली. मात्र या बैठकीला चिपळूणचे आ. शेखर निकम व खेडचे भाजपा नेते वैभव खेडेकर हे अनुपस्थित होते. चिपळूण येथील हॉटेल अतिथीच्या सभागृहात जिल्ह्यातील महायुतीच्या दिग्गज नेत्यांची आज बैठक संपन्न झाली. ‘‘या बैठकीत महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय अधिकृतपणे घेतला असून जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदांच्या उमेदवारांची पक्षनिहाय यादी लवकरच जाहीर करण्यात येईल. अंतिम ताळमेळ, प्रभागनिहाय वाटप आणि प्रचाराची रणनिती यावर वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरु आहे, ही चर्चा आटोपताच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल’’ अशी घोषणा यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळूण येथील या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी काही कार्यकर्त्यांना गर्भीत इशारा दिला. त्यांनी सांगितले, ‘‘मी पालकमंत्री आहे आणि ना. योगेश कदम हे गृहराज्य मंत्री आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस खात्याकडून तसेच गुप्तचर खात्याकडून आम्हाला सतत माहिती मिळत असते. त्यामुळे सकाळी इकडे आणि रात्री तिकडे असे करण्याचा कोणत्याही कार्यकर्त्याने प्रयत्न करु नये. अशा प्रकारचे आपले कृत्य रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या राजकारणावर परिणाम करणार नाही याचे भान महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवावे’’ अशा खणखणीत शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना जणू ‘डोस’ दिला. ना. उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, ‘‘आपला स्ट्राईक रेट जास्त आहे. तो आपल्याला आणखी वाढवायचा आहे आणि उद्धव ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट जास्तीत जास्त कमी होऊन ‘वजा’ कसा होईल यासाठी आपणा सर्वांना एकजुटीने काम करावयाचे आहे. महायुतीचे नेते जो उमेदवार देतील त्याचे काम इमानेइतबारे करा आणि ३ डिसेंबरला विजयी सभा घ्या’’ असे आवाहन ना. उदय सामंत यांनी केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, भूतपूर्व आ. राजन साळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, ज्येष्ठ नेते प्रशांत यादव, भूतपूर्व आमदार सुर्यकांत दळवी, केदार झाट्ये, राहुल पंडित, राजेश बेंडल, माजी आमदार संजय कदम, भूतपूर्व आमदार सदानंद चव्हाण, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे व शहराध्यक्ष मिलिंद कापडी आदी मान्यवर नेते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg