loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहरात भगवं वादळ, सामाजिक कार्यकर्ते अक्षय कांबळेसह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत

रत्नागिरी (जमीर खलफे) - रत्नागिरी शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जोरदार पक्षप्रवेश सुरू झाले आहेत. रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र.९ मधील सामाजिक कार्यकर्ते अक्षय कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवसेना उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करताना नगरपरिषदेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा अशा शब्दात मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रभाग क्र.९ मधील अक्षय कांबळे, नीलेश भागवत, समीर चव्हाण, सागर पवार, सुदील कांबळे, हर्षद चव्हाण, स्वप्नील आवळे, अक्षय कांबळे, सागर पवार, तुषार कांबळे, आयुष जाधव, विजय कनोजे, शौर्य कनोजे, आशिष कांबळे, आयुष कांबळे, नीलेश सावंत, नितीश कुबल, देवेंद्र शिंगळे आणि अक्षय चौधरी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी उपनेते माजी आमदार बाळ माने, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, उन्नती कोळेकर, प्रकाश सुर्वे, बिपीन शिवलकर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg