loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरूख नगरपंचायवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करा आम. निरंजन डावखरे

देवरूख (सुरेश सप्रे) - देवरूख नगरपंचाय निवडणूक ही खऱ्या अर्थाने पक्षासाठी समर्पण करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांला न्याय देण्यासाठीच आहे. हे लक्षात घेवूनच भाजपा. शिवसेना. व राष्ट्रवादी काँग्रेस. आरपीआय यांची महायुती म्हणूनच ही निवडणूक लढविली जात आहे. युती करताना सर्वच आपल्या मनाप्रमाणे होत नसते. त्यामुळे काहींवर अन्याय झाला असला तरी युती धर्म पाळला जाईल. तसेच या देवरुख नगरपंचायतीवर पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकविण्यासाठी मनभेद व मतभेद विसरून एकत्र येऊन काम करुन नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन कोकण निवडणूक प्रभारी विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवरूख नगरपंचाय निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठीच्या महायुतीच्या उमेदवार भाजपाच्या मृणाल अभिजित शेट्ये यांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराचा शुभारंभ ग्रामदेवता सोळजाई देवी मंदिर येथे नारळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी चिपळूण - संगमेश्वरचे आम. शेखर निकम. राजापूरचे आम. कीरण सामंत. निवडणूक समन्वयक भाजपानेते अतुल काळसेकर. माजी आम. सुभाष बने. शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित. युवानेते रोहन बने. प्रमोद अधटराव. विलास चाळके तालुका प्रमुख प्रमोद पवार. राष्ट्रवादीेचे तालुकाध्यक्ष राजू पोमेंडकर. राजू सुर्वे, पुजा निकम. आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

अर्ज दाखल करण्यापूर्वी सोळजाई मंदिर ते बाजारपेठ. बसस्थानक मार्गे नगरपंचायत अशी भव्य रॅली काढण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत कोकणात महायुती करण्याची मुहूर्तमेढ उभारण्याचा मान देवरूख नगरपंचाय निवडणूकीत मिळाला असून हाच आर्दश सर्व कोकणात पाहायला मिळेले. असा विश्वास आम.शेखर निकम यांनी व्यक्त करत देवरूख नगरपंचाय निवडणूकीत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करतील याची खात्री दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg