loader
Breaking News
Breaking News
Foto

मठ ग्रामपंचायतीत पाणलोट जाणीवजागृती प्रशिक्षण

लांजा (वार्ताहर) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत लांजा क्लस्टर १ मधील मठ ग्रामपंचायत येथे विकास सहयोग प्रतिष्ठान संस्थेमार्फत पाणलोट विषयावरील जाणीव जागृती प्रशिक्षण पार पडले . या प्रशिक्षणात पाणलोट व्यवस्थापनाचे महत्त्व, जलसंवर्धनातील ग्रामस्थांचा सहभाग, तसेच हिवरेबाजारच्या यशस्वी पाणलोट विकास मॉडेलचा संदर्भ देत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांना प्रत्यक्ष उदाहरणे, चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिकांद्वारे पाणलोट म्हणजे काय, त्याचे घटक कोणते, आणि सर्वांच्या सहभागाने त्याची अंमलबजावणी कशी शक्य आहे याविषयी माहिती देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाला मठ ग्रामपंचायतच्या सरपंच तथा पाणलोट समिती अध्यक्षा वैष्णवी साळवी, लांजा बळीराजा ऍग्रो प्रॉडक्ट्स कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष सुभाष पवार, पाणलोट समिती सचिव गोपीनाथ कांबळे, सदस्य संतोष अडबल, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बबन विठ्ठल कांबळे, माजी सरपंच व आम्रपाली शेतकरी गट अध्यक्षा मयुरी कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य पायल प्रशांत साळवी, तसेच शेतकरी बचत गटांचे प्रतिनिधी, ग्रामविकास अधिकारी समीर यशवंत गतरे, कृषी विभाग समूह संघटक दिपाली आंबेकर, सिव्हिल इंजिनियर शुभम भालेकर, मास्टर ट्रेनर ललेश कदम व विनोद चव्हाण प्रमुख उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

या प्रशिक्षणात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. उपस्थितांनी प्रशिक्षणातून ग्रामविकास, जलसंधारण आणि पाणलोट संवर्धनाबाबत नवी प्रेरणा आणि ज्ञान मिळाल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच वैष्णवी साळवी यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

जलसंवर्धनासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg