loader
Breaking News
Breaking News
Foto

हडी येथील कालिका देवीचा त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव उत्साहात साजरा

मालवण : (प्रतिनिधी) - हडी येथील श्री कालिका देवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव उत्साहात आणि बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मंदिर परिसरात दिव्यांची आरास व रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली श्री रामाची प्रतिमा लक्षवेधी ठरली. त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सवानिमित्त कालिका देवी मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी देवीच्या मंगल स्नानाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन देवीला सुवासिक फुलांची मनमोहक आरास करण्यात आली. त्यानंतर महाआरती होऊन ओटी भरण्यास प्रारंभ झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर गावराठीचे देव नागेश्वर मंदिर येथून कालिका मंदिर येथे आगमन झाले. सायंकाळी दीपोत्सव साजरा होऊन मंदिर परिसरात दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली. तर मंदिरही आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. दिव्यांची आरास व रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली श्री रामाची प्रतिमा सर्वांचे आकर्षण ठरली.

टाईम्स स्पेशल

गडगेवाडी सेवा मंडळ, हडी यांचे भजन, पोथी वाचन व बारापाच मानकऱ्यांच्या हस्ते गणेश पूजन व रात्री १२ वाजता गावराठी व पालखी प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला. यानिमित्त रात्री भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. या जत्रोत्सवास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg