loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नगरपंचायत निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज- मुख्याधिकारी अभिजीत कुंभार

लांजा (संजय साळवी) - लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून एकूण १७ प्रभागांकरिता एकून १९ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असल्याची माहिती लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली. लांजा नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी ४ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार नगरपंचायत कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. लांजा नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी एकूण १९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यावर्षी गोंडेसखल या नवीन मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा नगरपंचायतीचे एकूण मतदार हे १४ हजार २३२ इतके असून संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये वेगवेगळे टप्पे हाती घेण्यात आलेले आहेत. पहिला टप्पा हा नामनिर्देशन पत्र दाखल करणे असून सोमवार दि.१० ते सोमवार दि. १७ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी आहे. यासाठी शहर परिसरातील सर्व महा -ई- सेवा केंद्रांना आठवड्याचे सातही दिवस केंद्र सुरू ठेवण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांना त्या ठिकाणी जावून आपली नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. या निवडणूक कालावधीमध्ये एस.एस.टी., एफ.एस.टी., व्ही.व्ही.टी. आणि व्ही.एस.टी. ही चार पथके महत्वाची असतात. त्यापैकी एस.एस.टी. आणि एफ.एस.टी. ही दोन पदके कार्यान्वित आहेत.

टाईम्स स्पेशल

यामध्ये एकूण ९ पथके असून शहरातील कोर्ले तिठा, कुवे गणपती मंदिर आणि साटवली रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ही एस.एस.टी. ची तीन पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. मतमोजणी केंद्र हे लांजा नगरपंचायतीचे बहुउद्देशीय हॉल, लांजा हायस्कूल शेजारी असून त्या ठिकाणी मतपेठयांसाठी स्ट्राँग रूम देखील तयार केला आहे. अशी माहिती मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत बोलताना निवासी नायब तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गोसावी यांनी सांगितले की, एका मतदान केंद्रावर एक ईव्हीएम मशीन देण्यात येणार असून या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना संकल्प सिद्धी सभागृहाला या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याचे अनिल गोसावी यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg