मालवण (प्रतिनिधी)- मालवण तालुक्यात प्रथमच 'जय गणेश मूर्तिकार कारागीर संघटना ' अशी मूर्तिकारांची संघटना स्थापन झाली असून तीची कार्यकारिणीही निवडण्यात आली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी समीर यशवंत वर्दम यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी उमेश हडकर (हडी) व सचिवपदी संजय राधाकृष्ण केळूसकर (तारकर्ली) यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष समीर वर्दम म्हणाले मूर्तीकारांची मालवण तालुक्यातील ही पहिली संघटना स्थापन झाली असून ही संघटना तालुक्यातील गणपती मुर्ती व्यवसाय जास्तीत जास्त प्रमाणात विस्तृत कसा होईल व आपल्याला आर्थिक सुबत्ता कशी येईल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून वर्दम यांनी एकमेकांच्या सहकार्याने मदतीने व मार्केटींगने आपल्या मुर्ती व्यवसायाची व्याप्ती जिल्ह्याबाहेर संपूर्ण भारतभर व परदेशात कशी वाढवता येईल, व मूर्तिकार हा व्यवसाय बाराही महिने कसा चालू ठेवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आमच्या या उपक्रमासाठी व प्रयत्नांसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही संघटनेच्या वतीने वर्दम यांनी केले आहे.
या संघटनेची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - सहसचिव: सुशांत तायशेट्ये (मालवण), खजिनदार: नारायण गणपत लुडबे (मालवण, सहखजिनदार - हेमंत गुणाजी रामाडे, संघटक - राजा इम्ब्रापुरकर (मेढा), कार्यकारिणी सभासद - सुधीर पवार (श्रावण), आबा कोयंडे (कोळंब), हर्षद घाडी(मालडी -विरण), शरद गावडे (महान), बापूराव चव्हाण (आंगणेवाडी), पंढरीनाथ दत्ताराम नायणकर (मसुरे), रवींद्र साळकर (साळेल), संदीप गावडे (चौके), सुनील केळूसकर (देवबाग), सुधाकर चिंदरकर (वायरी), प्रकाश पवार (कुंभारमाठ), संदीप कोळगे (मालवण भरड), विलास भिवा देऊलकर (देऊळवाडा मालवण). सल्लागार- रतीलाल तारी (तारकर्ली), दिलीप शशिकांत वायंगणकर, तारक कांबळी यांची निवड करण्यात आली.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.