loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरूख नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

देवरूख (प्रतिनिधी) - देवरूख नगर पंचायतीच्या थेट नगराध्यक्षा व १७ नगरसेवक पदाच्या निवडणूकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून शहरात आचारसंहिता लागू झाली आहे. देवरूख नगर पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत एकुण मतदार१०.७८९ यात ५२०८पुरुष ५५८१ महिला मतदार आहेत. या निवडणुकीत दि. १० पासून उमेदवार अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. वेळ सकाळी १०ते ३. दि.११ चिन्ह वाटप. दि.१९ते २१ अर्ज मागे घेण्याची मुदत दिली आहे. २डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. १७ प्रभागातील मतदान ११ केंद्रावर होणार. भोंदे शाळा क्रमांक ३मधे तीन मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तर काही शाळांमध्ये दोन मतदान केंद्रे आहेत. सर्व तयारी सुरू आहे. शहरात तीन ठिकाणी तपासणी केंद्रे व फिरती पथके लक्ष ठेवायला सज्ज करण्यात आली आहेत. नगरपंचायत इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आहे. तसेच मतपेट्यासाठी स्टॉंग रूम असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच दि.३ रोजी मतमोजणीही नगर पंचायतीच्या आवारात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार गिरी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत भोसले काम पाहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg