loader
Breaking News
Breaking News
Foto

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रत्नागिरी तालूक्यात आंबेडकरी पक्ष एकत्ररित्या ताकदीनिशी उतरणार

रत्नागिरी - थिबाराजाकालीन बुध्दविहार संघर्ष समितीच्या माध्यमातून बुध्दविहार हवे यासाठी मोर्चा रत्नागिरी तालुकास्तरावर एकत्ररित्या यशस्वी झाला. मोर्चा यशस्वी झाल्यानंतर प्रस्थापित अन्याय करणारे जातीवादी पक्षांच्या विरोधात आंबेडकरी समाजात वातावरण तयार झाले,कारण बहुजनांवर केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील महायुतीचे शासन "सामाजिक-शैक्षणिक- आर्थिक" बाबतीत सतत अन्यायच करीत आहे, याचा बदला घेउन "मतपेटीतुन" आबेडकरी समाजाची उपद्रव देणारी ताकद दाखवण्याबाबत थिबाकालीन बुध्दविहार संघर्ष समितीचे अध्यक्ष एल.व्ही.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्या समवेत बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी ,भीम आर्मी , आर पी आय यांची संयुक्त बैठक डाँ.बाबासाहेब आंबेडकर भवन, सिव्हील हाँस्पीटल जवळ, रत्नागिरी येथे संपन्न झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद , जिल्हापरिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली त्यामध्ये आंबेडकरी समाजासोबत बहुजन चळवळीतील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांना घेउन एक संघर्षमय आणि विद्रोही ताकद तयार करण्याचे ठरले. येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची नगपरिषदेची नगराध्यक्ष निवडणुक, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक,जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणुकीत आपले स्वतंत्र उमेदवार देउन निवडणुक लढण्याचे ठरले. सदर बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई ) यांचे कडून एल. व्ही. पवार -कोकण प्रदेश अध्यक्ष, राजन जाधव - तालुका अध्यक्ष, शिवराम कदम, दिपक जाधव, बहुजन समाज पार्टी कडून राजेश सावंत - तालुका अध्यक्ष, अनिकेत पवार - जिल्हा प्रभारी, किशोर पवार, राजेश जाधव, रुपेश कांबळे- शहर अध्यक्ष,जेष्ठ कार्यकर्ते दिपक आयरे, अनंत पवार व वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र कांबळे - तालुका अध्यक्ष, बिपीन आयरे - महासचिव, वैभव जाधव - उपाध्यक्ष मुकुंद सावंत, अजित जाधव, आयुष्यमती विरश्री बेटकर आणि भीम आर्मी कडून प्रदिप पवार तसेच रत्नदिप कांबळे, देवेन कांबळे सर्व पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व पक्ष संघटनांची एक कोअर कमिटी तयार करुन येणार्या निवडणुकीची रणनिती आखेल हे ठरविण्यात आले, त्यामुळे आंबेडकरी समाजात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg