loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग केळीचेटेंब येथे कारचा भिषण अपघात, नशीब बलवत्तर म्हणून तीन जण सुखरूप

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मार्गावर आज दुपारी सुसाट वेगाने गोवा दिशेने जाणार्‍या कार चालकाचा दोडामार्ग केळीचेटेंब येथील वळणावर अचानक समोर वाहन आल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची दूरध्वनी केबल खांब व झाडाला जोरदार धडकून कार पलटी झाली. यावेळी कारमध्ये एक लहान मुलगी तसेच चालक मिळून तिघेजण होते. एवढा मोठा अपघात होऊन कार मधिल सर्व नशीब बलवत्तर म्हणून बचावले. सदर गोवा येथील हे आपल्या नातेवाईक यांच्याकडे गेले होते, अशी माहिती मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परवरी तसेच काणका गोवा येथील काही जण जीए. ०३ झेड ०३९० ही कार घेऊन तिलारी भागातील एका गावात नातेवाईक यांच्याकडे गेले होते. दुपारी ते पुन्हा माघारी जात होते. तेव्हा तीन वाजण्याच्या सुमारास कार सुसाट वेगाने गोवा दिशेने जात असताना दोडामार्ग केळीचेटेंब येथील धोकादायक तसेच अपघातग्रस्त वळणावर अचानक समोर वाहन आले, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विरूद्ध दिशेने जाऊन रस्ता कडेला असलेल्या दूरध्वनी महानेट लोखंडी खांब व झाडाला जोरदार धडकली. यावेळी रस्त्यावर असलेल्या इतर वाहन चालक नागरिक घटनास्थळी दाखल होऊन कारमधिल सर्वांना बाहेर काढले. नशीब बलवत्तर म्हणून एवढा मोठा अपघात होऊन देखील सर्व जण सुखरूप बचावले. या अपघातात कारचे लाखो रुपये नुकसान झाले आहे. घटनास्थळी गर्दी जमली होती. या ठिकाणी या अगोदर देखील अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg