loader
Breaking News
Breaking News
Foto

शिकारीच्या उद्देशाने फिरणार्‍या ४ संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी - पोलिस गस्त करत असताना मौजे- राजवाडी पैकी ब्राह्मणवाडी साईमंदिर समोर, ता. संगमेश्वर येथे मौ. अणदेरी ते राजवाडी मार्गाने बोलेरो पिकअप क्र. MH-०८ AP- ८६२१ या वाहनाच्या टपावर बसुन हॅंड टॉर्चचा लाईट शिकारीच्या उद्देशाने फिरणारे वाहन थांबवून गाडीची झडती घेतली असता वाहनामध्ये एकूण ०४ संशयित इसम, १२ बोअर बंदुक ०१, जिवंत काडतुसे ०६, हॅंड टॉर्च ०२ इ. मुद्देमाल मिळून आल्याने तो गाडीसह जप्त करुन पुढील चौकशी कामी ताब्यात घेण्यात आला. सदर कार्यवाही मध्ये ४ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपी क्र.१. विश्वनाथ शांताराम मालप वय २९ वर्षे, रा. अणदेरी, ता. संगमेश्वर २. गजानन मानसिंग इंदुलकर वय ४३ वर्षे, रा. हेदली, ता संगमेश्वर ३. रुपेश धोंडु पोमेंडकर वय ४१ वर्षे, रा. कारभाटले, ता. संगमेश्वर ४. राहुल रविंद्र गुरव वय २८ वर्षे, रा. तिवरे घेरा प्रचितगड, ता. संगमेश्वर अशी असुन सदर घटनेचा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद केला असून आवश्यक कागदपत्र तयार करून पुढील तपास चालू आहे,

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरची कार्यवाही माननीय मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर जी.गुरुप्रसाद सर (भा.व.से) व माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कार्यवाही साठी श्री प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, श्री सागर गोसावी वनपाल संगमेश्वर (देवरुख), वनरक्षक श्री. सुरज तेली आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे, यांनी ही कार्यवाही केली असुन पोलीस पाटील अणदेरी महेंद्र होडे, पोलीस पाटील राजवाडी विलास राऊत, सुलतान मालगुंडकर, अनंत तोरस्कर यांचे सहकार्य लाभले. अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडत असल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg