loader
Breaking News
Breaking News
Foto

बिल्डिंग नंबर 17, रूम नंबर 13.. इथेच रचला स्फोटाचा कट ! चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे

दिल्ली - दिल्ली स्फोटानंतर आता तपास यंत्रणांच्या हाथी काही महत्वपूर्ण पुरावे लागले आहेत. याप्रकरणात रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. एटीएसने आरोपींच्या कुटुंबियांची चौकशी केल्यानंतर, या कथेमागचे केंद्र आता फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठ बनले आहे. इमारत 17 मधील खोली नंबर 13 येथे संपूर्ण दहशतवादी कट रचण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. इथेच सगळा कट रचण्यात आल्याचे पुरावे सापडले आहेत. डॉ. शाहीना शाहिद हिची यात प्रमुख भूमिका होती, जिच्या अटकेमुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. शाहीनला फरीदाबादमध्ये स्फोटकांसह पकडण्यात आले होते. सुरुवातीच्या चौकशीत तिने फारसे काही सांगितले नाही, परंतु आता एटीएस आणि गुप्तचर संस्थांच्या चौकशीत सत्याचे अनेक मुद्दे समोर येऊ लागले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाहीनचे वडील, सईद अन्सारी, हे खंडारी बाजारात राहतात आणि वन विभागातून निवृत्त आहेत. त्यांच्या मुलीचा गेल्या दीड वर्षांपासून कुटुंबाशी कोणाशीही संपर्क नव्हता, असं त्यांनी सांगितलं. मला शोएब, शाहीन आणि परवेज़ अशी तीन मुलं आहेत. शाहीना ही पहिल्यापासून खुप साधी होती. 2013 मध्ये, तिने अचानक वैद्यकीय महाविद्यालयातील नोकरी सोडली आणि पुन्हा कधीही तिच्याशी नीट संपर्क साधला गेला नाही. शाहीन पूर्वी कानपूरमधील जीएसव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक होती. 2013 मध्ये, तिने कोणतीही सूचना न देता नोकरी सोडली. नंतर तिचं लग्न महाराष्ट्रातल्या जफर हयातशी झालं, पण 2015 मध्ये वाद झाले आणि नातं तुटलं.

टाईम्स स्पेशल

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीनच्या अटकेनंतर तिचा भाऊ परवेझ अन्सारी याचीही चौकशी सुरू होती. रात्री उशिरा लखनौमधील आयआयएम रोडवरील त्याच्या घरी छापा टाकण्यात आला. पण घराला कुलूप होतं, अखेर पथकाने कुलूप तोडत घरात प्रवेश केला आणि झडती घेतली. या घरातून लॅपटॉप, मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह आणि हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या. बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये इंटिग्रल युनिव्हर्सिटीचा पास सापडला. परवेझ हा त्याची बहीण शाहीनच्या सतत संपर्कात होता आणि दोघेही एका मोहिमेवर काम करत होते असा एटीएसला संशय आहे. चौकशीदरम्यान आणखी एक हैराण करणारी बाब समोर आली, ते म्हणजे शाहीनकडून जप्त केलेल्या कारचं लखनऊमध्ये रजिस्ट्रेशन झालं पण कारची नंबर प्लेट सहारनपूरची होती. त्याबद्दल हा प्रश्न विचारला असता तिने गोलमाल उत्तरं दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg