loader
Breaking News
Breaking News
Foto

सत्कोंडीच्या ग्रामस्थांनी जपला एकजुटीचा अनोखा वारसा, एका दिवसांत पाऊण लाखाचे श्रमदान

रत्नागिरी (संतोष कांबळे) : एखाद्या पारितोषिकासाठी गावकरी एकत्र येऊन श्रमदान करतात. यामध्ये काहीही नाविन्य राहिलेले नाही मात्र अशी कसलीही स्पर्धा नसताना, गाव करेल ते अन्य कुणी काय करेल अशी पूर्वापार चालत आलेली म्हण जयगड नजीकच्या सत्कोंडीच्या ग्रामस्थांनी एका दिवसांत पाऊण लाखाची कामे श्रमदानाने करून प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवली. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी आपल्या अनोख्या एकजुटीचा प्रत्यय पुन्हा एकदा दाखवून दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या अनेक वर्षापासून सत्कोंडीकर ग्रामस्थ गाव विकासासाठी श्रमदानाचे योगदान देत आलेले आहे. सत्कोंडी हे गाव थोर समाज नेते कॉग्रेस पक्षाचे प्रख्यात नेते स्व. अनंतराव बैकर यांचं गाव. वडिलांचा समाज सेवेचा वारसा त्यांचे सुपुत्र संजय अनंतराव बैकर हे चालवत आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र काम करण्याची सवय या गावाच्या अगदी अंगवळणी पडली आहे. काही वेळेला संपूर्ण गाव, काही वेळेला गावातील विभागांचे गट करून श्रमदान तर काही वेळेला धार्मिक कामे असताना त्या कामासाठी आवश्यक माणसे पाठवून उर्वरित लोकांचे उत्स्फूर्त श्रमदान अशा रीतीने गावाच्या सामूहिक हितासाठी ही मंडळी आपले आपला सहभाग नोंदवत असतात.

टाइम्स स्पेशल

काल सुट्टीचा दिवस ठरवून लग्नविधीचे धार्मिक काम असताना मंदिरात धार्मिक कामासाठी सात माणसे जाऊन उर्वरित 32 लोकांनी श्रमदानामध्ये आपल्या सहभाग नोंदवला. यामध्ये 20 लोकांनी पूर्ण दिवस तर बारा लोकांनी अर्धा दिवस श्रमदान केले. धार्मिक काम नसलेल्या विभागाने सुद्धा या श्रमदानामध्ये आपला सहभाग नोंदवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg