loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणच्या दत्त मंदिरातील काकड आरती सोहळ्याची सांगता

मालवण (प्रतिनिधी) - "दिगंबरा दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असा जयघोष करत टाळ मृदूंगाच्या साथीने आणि ढोल ताशांच्या गजरात आज मालवण भरड येथील दत्त मंदिरात कार्तिक स्नान समाप्तीच्या निमित्ताने पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला. या सोहळ्यास शेकडो भाविक सहभागी झाले होते. मालवण शहरातील भरड येथील जागृत देवस्थान असलेल्या एकमुखी दत्त मंदिरात गेले महिनाभर सुरु असलेल्या काकड आरती सोहळ्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला झाली. कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पासून काकड आरतीला प्रारंभ झाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोज पहाटे ५. १० वाजल्यापासून ते ७. १५ वाजेपर्यंत काकड आरती होत होती. अत्यंत मंगलमय आणि भक्तीपूर्ण वातावरणात होणाऱ्या या काकड आरतीमुळे भरड मालवण परिसर भारून गेला होता. आज पहाटे ५ वाजल्यापासून ७ वाजेपर्यंत काकड आरती पार पडली. त्यानंतर दत्त मंदिरापासून भरड नाक्यावरील नगरपालिकेच्या गाडी पार्किंग जागेच्या रस्त्यालगत असणाऱ्या महापुरुष स्थानाना भेट देत दत्त महाराजांची पालखी प्रदक्षिणा पार पडली.

टाईम्स स्पेशल

संतांचे अभंग गात आणि "पायी हळूहळू चाला, मुखी दत्तनाम बोला", असा दत्त नामाचा जयघोष करत ही पालखी प्रदक्षिणा पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांनी पालखीला श्रीफळ वं गोड पदार्थ ठेवत नवस बोलले वं नवस फेडले. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते. सायंकाळी मंदिरातील तुलसी विवाह आणि श्री दत्त महाराजांची शेजारती पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

"पायी हळूहळू चाला, मुखी दत्तनाम बोला"

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg