loader
Breaking News
Breaking News
Foto

पाळीव जनावरे मोकाट सोडून देणा-या धुंदरे येथील तिघांविरुद्ध लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - पाळीव जनावरे मोकाट सोडून देणा-या लांजा धुंदरे येथील तीघा इसमाविरुध्द लांजा पोलीस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लांजा पोलीसांकडून दिलेल्या माहीतीनुसार रविंद्र बाळशेठ गांधी वय ५८, बाबल्या पांडुरंग लांबोरे ५७, कृष्णा लिंगायत ५२ सर्व राहणार धुंदरे यांची पाळीव जनावरे ही जुन महिन्यापासून आज पर्यंत मोकाट सोडून देण्यात आली आहेत. सदर जनावरे ही मोकाट रस्त्यावरुन भटकत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच रस्त्यावर मधोमध बसत असल्याने वाहनांना अडथळा होऊन अपघात होण्याच्या घटना घडत असतात. जनावरांच्या मालकांना ग्रुप ग्रामपंचायत बेनी खुर्द खेरवसे वतीने वारंवार सांगुन देखील जनावरांना दावे न लावता जाणीवपूर्वक मोकाट सोडून दिली. याबाबत सरपंच रुपाली रविंद्र लोटणकर यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी लांजा पोलीस स्थानकात रविंद्र गांधी, बाबल्या लांबोरे, कृष्णा लिंगायत याच्या विरुद्ध भा.द.वि.कलम २०१२, ९०(अ) (१)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg