loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रा. श्री. पु. भागवत यांच्या स्मरणार्थ परिसंवादाचे १५ रोजी देवरुख येथे आयोजन

देवळे (प्रकाश चाळके) - शनिवार दि. १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी देवरुख मधील डी-कॅड, कॉलेजमध्ये ’कला- साहित्य-संस्कृती व्यवहार’ या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मराठी साहित्याचे लेखक- अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत ते धुळे जळगाव पासून गोव्यापर्यंतचे ज्येष्ठश्रेष्ठ अभ्यासक निबंध वाचन-भाषण करणार आहेत. सदर परिसंवाद देवरुखचे सुपुत्र दिवंगत प्रा.पु. भागवत यांच्या जन्मशताब्दी पूर्ततेनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केले आहे. त्याच्या आयोजनाची जबाबदारी येवला(जि. नाशिक), येथील ’अनुष्टुभ प्रतिष्ठान’ या प्रतिष्ठित वाङ्मयीन संस्थेने घेतलेली आहे आणि स्थानिक आयोजन प्रसिद्ध उद्योगपती अजय पित्रे यांच्या नेतृत्वाखालील देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, कॉलेजने घेतले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे पु. भागवतांच्या पूर्वीच्या जन्म घरी या उपक्रमाचा उपक्रमाचा सुयोग जुळून आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी व वाङ्मयप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, अशी संयोजकांची अपेक्षा आहे. आधुनिक मराठी वाङ्मयाच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये व त्याचे पालनपोषण करण्यामध्ये प्रा. पु. भागवत यांचे योगदान फारच तोलामोलाचे आहे. ’मौज’ आणि ’सत्यकथा’ या नियतकालिकांचे ते सुजाण संपादक होते आणि ’मौज प्रकाशन गृहा’ची ख्याती अवघ्या महाराष्ट्रात सुपरिचित असून, त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांना जास्तीत जास्त साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी दोन साहित्यिक प्रा. वसंत आबाजी डहाके व प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर हे यामध्ये सहभागी होणार आहेत. उद्योजक अजय पित्रे देवरुख हे उद्घाटक असणार आहेत. बीजभाषक प्रा. वसंत आबाजी डहाके, अमरावती हे असणार आहेत.

टाइम्स स्पेशल

सकाळी ११.०० ते १२.०० पहिले सत्र लोकसंस्कृती हे असणार आहे. अध्यक्ष अतुल पेठे, पुणे,वक्ते: डॉ. गोविंद काजरेकर, बांदा , डॉ. मुकुंद कुळे, मुंबई, शाहीद खेरटकर, चिपळूण. दुसरे सत्र: दुपारी १२.०० ते १.०० भाषासंस्कृती असणार आहे. अध्यक्ष: डॉ. दिलीप धोंडगे, सटाणा-नाशिक वक्ते डॉ. दीपक पवार, मुंबई , डॉ. नंदकुमार मोरे, कोल्हापूर. दुपारी १.०० ते १.४५ तिसरे सत्र: दुपारी २.०० ते ३.०० माध्यमसंस्कृती अध्यक्ष : डॉ. महेश केळुसकर, ठाणे, वक्ते: युवराज मोहिते, मुंबई, संपदा जोगळेकर, संगमेश्वर, पराग वडके, चिपळूण चौथे सत्र: दुपारी ३.०० ते ४.०० वाङ्मयीन संस्कृती अध्यक्ष : डॉ. अविनाश सप्रे, सांगली वक्ते: डॉ. प्रमोद मुनघाटे, नागपूर, डॉ. आशुतोष पाटील, धुळे, डॉ. शीतल पावसकर-भोसले, ठाणे. समारोप: प्रा. डॉ. सुरेश जोशी, देवरुख हे करणार आहेत. परिसंवादाला साहित्य प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर अध्यक्ष, अनुष्टुभ प्रतिष्ठान, येवला, प्राचार्य रणजित कृ. मराठे देवरुख कॉलेज ऑफ आर्ट ंड डिझाईन यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विश्वस्त, अनुष्टुभ् प्रतिष्ठान प्रा. जयप्रकाश रामचंद्र लब्दे,सारंग गोविंद पाटील यांचेशी संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

वाङ्मयप्रेमींना बौद्धिक फराळ

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg