loader
Breaking News
Breaking News
Foto

आबलोली येथे कुणबी नागरी सह. पतसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील आबलोली येथे गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात शासन निर्देशित आदर्श उपविधी स्वीकृत करणेबाबत या महत्त्वाच्या विषयावर पतसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात संपन्न झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते यांनी सभेचे प्रास्ताविक केले तर कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर यांनी सभेच्या सूचने नुसार शासन निर्देशित आदर्श उपविधीच्या पुस्तकातील 1 ते 64 पानातील प्रत्येक मुद्द्याचे वाचन केले. त्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र गुरुजी, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, ज्येष्ठ संचालक पांडुरंग पाते यांनी पतसंस्थेची "अ" वर्गातील वाटचाल, आगामी आव्हाने, कर्ज वाटप, कर्ज वसुली तसेच शासन निर्देशित आदर्श उपविधी स्वीकृत करणे बाबत.मौलिक मार्गदर्शन केले. त्यानंतर पतसंस्थेचे संपर्क प्रमुख अनंत गावडे यांनी सूचना मांडली या सूचनेला संपर्कप्रमुख विजय मसुरकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी यांनी शासन निर्देशित आदर्श उपविधी स्वीकृत करणे या ठरावाची घोषणा केली आणि उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात हा ठराव मंजूर केला.

टाइम्स स्पेशल

यावेळी गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, ज्येष्ठ संचालक पांडुरंग पाते, संचालिका श्रावणी पागडे, तज्ञ संचालक अनंत पागडे, संदीप पाष्टे, संचालक महादेव वणे, संदेश कदम, अमोल वाघे, उदय गोरिवले, वैभव आदवडे यांचेसह गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली, शाखा शृंगारतळी, शाखा हेदवी या तिन्ही शाखा मधील सभासद महिला - पुरुष तसेच संपर्कप्रमुख बहुसंख्येने उपस्थित होते. या संपूर्ण सभेचे व्यवस्थापन कार्यलक्ष संचालक अनिल घाणेकर, कर्मचारी संजय आग्रे, वैभव बागवे, संतोष हुमणे, संजय खापले, सुशील फडकले, सचिन भेकरे, प्रणय मोहिते यांनी केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg