loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शहराध्यक्ष निलेश भोसले प्रभाग क्र.१४ मधून निवडणुक रिंगणात उतरणार

रत्नागिरी (वार्ताहर) - रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीची जोरदार राजकीय हवा शहरात सुरु असून अनेक इच्छुक उमेदवारांची नावे समोर येत आहेत. अनेक तरुण कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तसेच जुन्या, जाणत्या, अनुभवी कार्यकर्त्यांनाही उमेदवारी हवी आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये जोरदार चढाओढ सुरु आहे. यामध्ये लक्षवेधी म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष निलेश निनादेवी नंदकिशोर भोसले हे प्रभाग क्र.१४ मधून महाविकास आघाडीतर्फे उभे राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर शिक्कामोर्तब झाला असला तरी अधिकृतपणे नाव अजून जाहीर केलेले नाही. निलेश भोसले हे एक सृजनशील असे व्यक्तीमत्व असून अजातशत्रू आहेत. आपल्या भागातील प्रश्‍नांची त्यांना जाण आहे. सभागृहात आपल्या प्रभागाचे प्रश्‍न ते कणखरपणे मांडू शकतात, त्यामुळे निलेश भोसले यांची उमेदवारी आवश्यक असल्याचे त्यांच्या समर्थकांतून सांगितले जात आहे. आता पक्ष ठरवेल त्यानुसार उमेदवारी जाहीर होईल, असेही म्हटले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg