loader
Breaking News
Breaking News
Foto

झोळंबे येथील पांडुरंग मंदिरात २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - वैकुंठवासी ह.भ.प.प.पू.सद्‌गुरु वासुदेव महाराज वझे यांच्या आश्रयाखाली चालत आलेल्या श्री पांडुरंग मंदिर झोळंबे, दोडामार्ग, येथे मार्गशीर्ष शुक्ल ५ मंगळवार दिनांक २५/११/२०२५ ते मार्गशीष शुक्ल १२ मंगळवार दिनांक २/१२/२०२५ अखेर ७ दिवस अखंड हरिनाम सप्ताह करण्याचे संत तुकाराम महाराज वारकरी सांप्रदाय, अनुयायी भक्त मंडळीनी आयोजित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वे जयंती वर्ष व जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे वैकुंठ गमन वर्ष हेच औचित साधुन रोज सकाळी ८ ते १२ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. त्यासाठी सर्व अनुयायी भक्त गणांनी भाविकांनी अहर्निश सक्रीय उपस्थित राहुन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. ज्यांना कोणाला पारायणास बसावयाचे असेल त्यांनी नारायण बाळकृष्ण वझे झोळंबे मो. ९४०५२२६७६०, ९८८१८६०६६० किंवा ९४२१०९१३७३ या नंबरवर संपर्क साधुन नाव नोंदणी करुन घ्यावी. तसेच भजन सेवा करावयाची असेल तर रात्री नित्य हरिपाठानंतर भजन सेवा करावी, अशी असे आवाहन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg