loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची वृद्धाश्रम भेट — संवेदनांचा अनोखा अनुभव

खेड (प्रतिनिधी) - रोटरी स्कूलच्या इ. पाचवीतील विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव आणि सहानुभूती जोपासण्यासाठी आंबये येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना जेष्ठ नागरिकांविषयी आदर, प्रेम आणि काळजी या मूल्यांची जाणीव करून देणे हा होता. वृद्धाश्रमात प्रवेश करताच विद्यार्थ्यांचे आजी-आजोबांनी हसतमुखाने स्वागत केले. मुलांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला, गाणी गायली, गोष्टी सांगितल्या आणि लहानशा भेटवस्तू दिल्या. त्या क्षणी वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंदाचे भाव विद्यार्थ्यांच्या मनात कायमचे कोरले गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी एक महत्त्वाचा धडा घेतला. खरा आनंद देण्यात आणि प्रेम वाटण्यात असतो. निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळले, पण अंतःकरणात मात्र कृतज्ञतेची भावना आणि वडीलधाऱ्यांविषयी आदर निर्माण झाला. हा दिवस रोटरी स्कूलच्या इतिहासात नेहमीच संस्मरणीय ठरेल. विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg