loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभव खेडकर यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपाची ताकद वाढली – आमदार निरंजन डावखरे

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील महाड नाका परिसरात भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी बोलताना आमदार डावखरे म्हणाले की, “खऱ्या अर्थाने दापोली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची स्वतंत्र आणि मजबूत संघटनात्मक ताकद वैभवजी यांच्या आगमनानंतरच उभी राहिली आहे. आता येणाऱ्या सर्व निवडणुकांकडे संघटित आणि सकारात्मक दृष्टीकोनातून काम करण्याची आपली तयारी असायला हवी.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते पुढे म्हणाले की, या नव्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचे, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे आणि योग्य ठिकाणी न्याय मिळवून देण्याचे काम अधिक वेगाने आणि प्रभावीपणे होईल. त्यामुळे जनतेपर्यंत प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या समस्या ऐकणे आणि सोडवणे ही आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी रहीम सईबोले यांच्या कार्याचा उल्लेख करत आमदार डावखरे म्हणाले, “रहीम सईबोले यांच्या माध्यमातून राम आणि रहिम यांचा सुंदर संगम कोकणात दिसून येत आहे. समाजात एकता, सौहार्द आणि आपुलकी निर्माण करणारे असे कार्यच भाजपाची खरी ताकद आहे.”

टाइम्स स्पेशल

दापोली आणि खेड परिसरात गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाची जनाधारात मोठी वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले. “ही ताकद पुढील काळात आणखी द्विगुणित होणार आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे सचोटीने काम करणे आवश्यक आहे,” असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg