loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणातील वेहेळे पंचायत समिती गणातून भाजपकडून अशोक गिजे इच्छुक

चिपळूण :- तालुक्यातील वेहेळे पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाकडून जुने जाणते निष्ठावंत कार्यकर्ते तालुका कार्यकारणी सदस्य अशोक कृष्णा गिजे यांचे नाव इच्छुक म्हणून पुढे आले असून त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील केली आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास या गणातून आपण निश्चित विजय प्राप्त करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वेहेळे पंचायत समिती गण हा शिरगाव अलोरे जिल्हापरिषद गटात समाविष्ट आहे.अतिशय विस्तारित असा हा परिसर असून येथील पंचायत समितीची जागा ही राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची मानली जाते.गेल्या निवडणुकीत येथून शिवसेनेने बाजी मारली होती.मात्र यावेळी भाजप ने देखील कंबर कसली असून सद्याचे राजकीय वातावरण बघता येथे भाजपला पोषक वातावरण दिसून येत आहे.त्यामुळे अशोक गिजे यांनी थेट निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेऊन पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशोक गिजे हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते असून तालुका कार्यकारणीवर त्यांनी अतिशय उत्तम असे काम केले आहे. तसेच या पंचायत समिती गणात सतत त्यांचा संपर्क राहिला आहे.परिसरात प्रत्येक वर्षी भव्य अशी कबड्डी स्पर्धा आयोजित करून त्यांनी स्थानिक तरुणांना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे.त्यातून अनेक नवीन खेळाडू निर्माण झाले असून त्यांनी जिल्हा व राज्य पातळीपर्यंत मजल मारली आहे. तसेच जिल्हापरिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप आणि परिसरातील विकास कामांकडे देखील त्यांनी बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे. अतिशय मनमिळावू, शांत संयमी, सुशिक्षित, आणि सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची परिसरात ओळख असून तरुण कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी देखील त्यांच्याकडे आहे.

टाइम्स स्पेशल

शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या परिसरात त्यांनी भाजपसाठी उत्तम असे संघटन निर्माण करून एक नवा पर्याय उभा केला आहे. त्यामुळे भाजपची ताकद येथे वाढली आहे. साहजिकच इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आले असून सर्वसामान्य लोकांची पसंती देखील त्यांना मिळत आहे. त्यामुळे पक्षाकडे अशोक गिजे यांनी उमेदवारीची मागणी केली असून पक्षाने उमेदवारी दिल्यास ही जागा कमळ या निशाणीवर जिंकून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg