loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वातंत्र्याच्या भावनेने दुमदुमला दोडामार्ग

दोडामार्ग (प्रतिनिधी) - “वंदे मातरम्” या अमर राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने फक्रोजीराव देसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग येथे भव्य व देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला तहसीलदार राहुल गुरव, प्राचार्य, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शरदचंद्र गवस यांनी वंदे मातरम् गीताचा ऐतिहासिक प्रवास आणि त्यामागील राष्ट्रभावना यावर प्रकाश टाकताना सांगितले की, “वंदे मातरम्” ही केवळ घोषणा नसून ती स्वातंत्र्याचा श्वास आहे. १८७५ मध्ये या गीताची निर्मिती झाली आणि त्या क्षणापासून भारतीय जनतेच्या मनात स्वाभिमानाचा ज्वालाग्राही दीप पेटला. त्यांनी पुढे सांगितले की, स्वातंत्र्यानंतर संविधान सभेने ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत स्वीकारले, मात्र ‘वंदे मातरम्’ या गीताला राष्ट्रगीतातील दर्जा देत स्वतंत्र स्थान दिले. हे गाणे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्थान ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि घोषणांद्वारे देशप्रेमाचा उत्साह साकारला. तहसीलदार राहुल गुरव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले, “आपला दोडामार्ग तालुका नैसर्गिक संपन्न आहे; आपण सर्वांनी मिळून आपल्या समाजात एकता, एकोप्याची भावना जोपासली पाहिजे. राष्ट्रासाठी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ओळखून काम करणे हेच खरे वंदे मातरम् आहे.” या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठे योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकमुखाने “वंदे मातरम्”चा जयघोष करत देशभक्तीची भावना अधिक प्रखर केली. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार राहुल गुरव, पञकार भूषण सावंत, गड किल्ले संवर्धन सदस्य सिद्धेश परब व समिर गवस, आय.टी.आय. चे निदेशक संदीप बिबवणेकर आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg