loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगारांच्या विविध मागण्या अधिवेशनात मांडण्यासाठी आम. अशोक पाटील यांना निवेदन

मुंबई. (प्रतिनिधी) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन संस्थापक अध्यक्ष सुरेश शंकर केसरकर तसेच मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत कामगार राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगारांच्या मागण्या विविध विधानसभेत तसेच अधिवेशनात मांडण्यासाठी व मंजूर करून घेण्याबाबत भांडुप विधानसभेचे कार्यसम्राट आमदार अशोक धर्मराज पाटील यांना प्रत्यक्ष त्यांच्या ऑफिसला भेट देऊन पत्र समक्ष सादर केले. त्यावेळी आपणास निदर्शनास आणून देतो की प्रधान सचिव कामगार यांच्या वतीने नामदार कामगार मंत्री महोदयांना शासनाच्या विविध विभाजनाचा पुरस्कारार्थीप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस मधून सवलत मिळणे बाबत योजना स्वरूपात प्रस्ताव अंतिम मंजूर केलेला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या एकमेव करण्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार या योजनेचा लाभ मिळत नाही. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे मंडळाच्या वतीने केलेल्या प्रस्तावामुळे राज्य सरकार वरती कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक भार पडत नाही. या योजनेच्या सर्व खर्च कामगार कल्याण मंडळ करणार आहे. अशा बरेच मागण्या त्यावेळी सादर केल्या व समक्ष विनंती केली त्यावेळी कार्यसम्राट आमदार अशोक पाटील यांनी मी माझ्या परीने विधानसभेत मांडतो असे आश्वासन दिले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg