loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबडोस माजी सरपंच उबाठा जेष्ठ कार्यकर्ते दिलीप परब यांसह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण (प्रतिनिधी) : आंबडोस गावाचे माजी सरपंच तथा उबाठाचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप सीताराम परब यांनी अनेक सहकारी व ग्रामस्थांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे शिवसेनेत स्वागत केले. आंबडोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह माजी सरपंच दिलीप परब, सरपंच सुबोधिनी परब, माजी सरपंच विष्णू परब यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी यावेळी माजी सरपंच दिलीप परब आणि अजिंक्य परब, निवृत्ती परब व सहकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जनार्दन नाईक, सुरेश परब, चंद्रकांत परब, सुलोचना राणे, सुधा परब, प्रणाली चव्हाण, पूजा परब, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी गावागावात जनतेला अपेक्षित असलेला विकास साध्य करत असताना मतदार संघात अधिकाधिक विकासनिधी खेचून आणणे हेच आपले पाहिले लक्ष आहे. विधानसभा, मंत्रालय स्तरावरून विकासनिधी प्राप्त होत असताना राणे हे आडनाव असल्यामुळे अधिक सोपे होते. यापुढे मालवण कुडाळ मतदारसंघ सर्वाधिक विकास निधीच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासह राज्यात आदर्श मतदारसंघ बनवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आंबडोस गाव हा 1990 पासून नेहमीच राणे साहेबांसोबत राहिला. 100 टक्के मताधिक्य देणारा हा गांव आहे. या गावच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत 25 लाख निधी मंजूर होईल. सोबतच गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध असल्याचे दत्ता सामंत म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg