loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनवी पुलाच्या गर्डरचे काम सुरु असल्याने 13 नोव्हें. ते 26 नोव्हें. मुंबई-गोवा मार्ग बंद राहणार

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर येथील सोनवी पुलाच्या गर्डरचे काम सुरु असल्याने 13 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर मुंबई गोवा मार्ग बंद राहणार असल्याने वाहन चालकांनी कोळंबे, कोसुंब मार्गे संगमेश्वर या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. जर बुरंबी मुचरी मार्गे कळंबस्ते या जिल्हाप्रमुख मार्गाचे काम झाले असते तर आज छोट्या वाहन चालकांना नक्कीच सोईचे झाले असते. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख विघ्रवली सोनवडे मुचरी कळंबस्ते रस्ता प्र. जि. मा. क्र. ४६ हा रस्ता सुमारे ३० ते ४० वर्ष अस्तित्वात आहे. परंतु रस्त्यावरील मुचरी गवळ वाडी ते कळंबस्ते हा भाग सुमारे २.५० ते३. की.मी. भाग दुर्लक्षित आहे. तसेच वाहतुकीस योग्य नाही. व प्र. जि. मा. असलेल्या रस्त्याची अवस्था दयनीय आहे. सदर रस्ता सुरक्षित असेल तर सध्या संगमेश्वर शास्त्रीपूल ते तुरळ हायवे वरील ये-जा करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या संगमेश्वर स्थानकाजवळ सोनवी पुलाच्या गर्डरचे काम सुरु आहे, महामार्गचे काम देखील सुरु आहे. संगमेश्वर सोनवी चौकात वाहतूक कोंडीचा सामना नेहमीच वाहन चालकांना करावा लागतो. याला पर्याय म्हणून देवरुख वरून जाणारा वाहनधारक संगमेश्वरकडे न जाता सरळ बुरंबी मार्गे कळंबस्ते फणसवणे, ताम्बेडी चिखली कडवई तुरळ हायवे पर्यंत जाणाऱ्या वाहनधारकांची सोय होईल. यासाठी मुचरी गवळवाडी दत्तमंदिर ते कळंबस्ते या प्र. जि. मा. रस्त्याच्या भागाची तात्काळ दुरुस्ती करणेत यावी अशी पंचक्रोशीतील ग्रामस्थ विनंती करत आहेत. तरी वरील परिस्थितीवर संबधित विभागाने आणि लोकप्रतिनिधीनी या बाबींचा विचार करावा अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg