loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरची ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी देवीचा २१ नोव्हेंबर रोजी देव दिवाळी उत्सव

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर येथील श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानच्या वतीने ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी देवीच्या मंदिरात देव दिवाळी उत्सव शुक्रवार दि.२१ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असून देव दिवाळी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. देव दिवाळीनिमित्त जत्रा भरणार आहे. या निमित्ताने पहाटे ५ ते ५.३० वा.काकड आरती,सकाळी ६.३० ते ७.३० वा.अभिषेक व पूजा सकाळी ९ वा.देवांना रुपे लावणे, सकाळी १० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत देवदर्शन, रात्रौ १० वाजे पर्यंत गांवातील भजनांचा कार्यक्रम, शनिवार दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वा. देवांचे रुपे उतरविणे. आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तरी या देव दिवाळी कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान गुहागरचे अध्यक्ष शरद कृ. शेटे, सेक्रेटरी अरुण शं. गुरव, खजिनदार मुरलीधर आ. बागकर व सर्व देवस्थानचे कमिटी सदस्य यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg