मुरुड जंजिरा - तालुक्यातील बोर्ली मांडला (जि. रायगड) येथे ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात झाला. याप्रसंगी शैक्षणिक उपक्रमांतर्गत होतकरू ६० मुला - मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. या मुलींना शाळेत जाणे सोयीचे व्हावे यासाठी हे सायकलिंचे मोफत वाटप करण्यात आले. हे वाटप आमदार महेंद्र शेठ दळवी, भाजपाचे ॲड. महेश मोहिते, सुरेंद्र मोहिते, ॲड. मनस्वी मोहिते, सरपंच राजश्री मिसाळ, आपण पाटील, शिवसेनेचे दीपक रानवडे, भारत बेलोसे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
जनसामान्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांसाठी असे अनेक उपक्रम राबवले जातात. अनेकांना शिक्षणासाठी मदत केली जाते. प्रारंभी सुंदर सजवलेल्या रथांमधून सिद्ध पादुकांची दोन किलोमीटर अंतरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यात झेंडेदारी, कलशधारी महिला, भजनी मंडळ पुरुष व महिला आदींचा समावेश होता.
महिला लेझीम पथक, महिला बँड पथक, कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, ढोल पथक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ सजीव देखावा, प्रभू रामचंद्र सहकुटुंब सहपरिवार असे सजीव देखावे यावेळी सादर करण्यात आले. संतपिठावर पादुका ठेवण्यात आल्या. त्यांचे रांगेने दर्शन घेण्यात आले. यावेळी भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.