loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर शहरात उबाठा गटाला मोठा धक्का, गुरववाडीतील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

देवळे (प्रकाश चाळके) - आगामी नगरपरिषदेच्या दृष्टीने राजापूर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शहरातील गुरववाडी परिसरातील उबाठा गटाचे पदाधिकारी व अनेक ग्रामस्थांनी शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रवेशामध्ये उबाठा गटाचे प्रभाकर गुरव (उपशहरप्रमुख), ऋषिकांत अमरे (युवा उपशहरप्रमुख), विनायक गुरव,(शहर विभागप्रमुख), विश्वनाथ गुरव (बूथ प्रमुख), शुभांगी गुरव (महिला उपशहरप्रमुख) यांच्यासह गुरववाडीतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा स्वीकारला. या प्रवेशामुळे आगामी राजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टाइम्स स्पेशल

उबाठा गटाला हा धक्का मानला जात असून, या घडामोडींमुळे शिवसेनेची ताकद अधिक वाढल्याचे दिसते. गुरववाडी ग्रामस्थांनी सांगितले की, “शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे.” आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, त्याचा परिणाम म्हणून हा मोठा पक्षप्रवेश झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg