loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण तालुकास्तरीय कविता स्पर्धेत अनुराधा आचरेकर प्रथम

मालवण (प्रतिनिधी) - आचरे येथील यशराज प्रेरणा व वायंगणी विकास मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे घेण्यात मालवण तालुकास्तरीय कविता स्पर्धेत अनुराधा अनिरुद्ध आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. आचरे येथे डॅफोडिल्स रिसॉर्ट येथे मालवण तालुक्यातील नवकवींसाठी मालवण तालुकास्तरीय कविता स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन आचरा उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निलेश सरजोशी, अनुष्का गांवकर, जयप्रकाश परूळेकर, रविंद्र गुरव, बाबाजी मिसळे, भावना मुणगेकर, अशोक कांबळी, सचिन रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, अनिरूद्ध आचरेकर, विनय वझे, स्वप्निल गोसावी, मानसी सरजोशी, मंदार सरजोशी, राजेश भिरवंडेकर, खूशी बापट, गौरी बापट आदी मान्यवर, रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश भिरवंडेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत अनुराधा अनिरुद्ध आचरेकर यांनी प्रथम क्रमांक, मधुरा वझे यांनी द्वितीय क्रमांक तर मैत्रीय बांदेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. अश्विनी सावंत प्रथम उत्तेजनार्थ, भूषण दत्तदास यांना व्दितीय उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सौरभ चव्हाण, सदगुरू साटेलकर, मेहेक शेख, नरेंद्र कोदे, स्वालिया शेख, योगेश मुणगेकर, अर्चना गव्हाणकर यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो व रामचंद्र कुबल यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. यावेळी ॲड. समृध्दी आसोलकर यांनी आभार प्रदर्शन केले. अक्षय सातार्डेकर यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg