loader
Breaking News
Breaking News
Foto

वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष यांच्या सहित कार्यकर्त्यांचा उबाठा शिवसेना पक्षात प्रवेश

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - चिपळूण तालुक्यातील रामपूर गटातील बामनोली गावातील वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजाराम बापू घाणेकर यांच्या सहित कर्त्यांनी आज आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या वेळी आमदार जाधव असे म्हणाले की शिवसैनिकांना संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाच कौतुक. आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व लोकांना मान्य भास्कर जाधव यांनी प्रवेश कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केले. आपले जुने सहकारी जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी केली असे विचारले असता आमदार भास्कर जाधव म्हणाले की जुना सहकारी म्हणून प्रेम दाखवणे वेगळं आणि तेच प्रेम जर आपल्या मुळावर येत असेल तर त्याला त्याची जागा दाखवणे योग्य.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रीतम वंजारे यांच्या नेतृत्वाखाली बाबणोलि गावचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजाराम बाबू घाणेकर, युवा कार्यकर्ते राकेश घाणेकर, प्रणित कोंडविलकर, गोकुळ कोटकर, अल्पेश डिंगणकर, संदेश गमरे, लक्ष्मण तांबिकर आधी कार्यकर्त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी गुहागरचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, विनायक मुळे, सतीश मोरे, जयदेव मोरे,, राज विखारे, सिद्धिविनायक जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg